देशातील कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भारतीय कर्मचारी संघ (BKS) व भारतीय स्वाभिमानी संघ (BSS) यांचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन 30, 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वाभिमानी संघाचे राज्य अध्यक्ष मा. विठ्ठल दांडगे यांनी फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या संपूर्ण बहुजन समाजाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.✊ बहुजन हक्कांसाठी राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचा निर्धारमा
. विठ्ठल दांडगे म्हणाले की,
“आज देशात कर्मचारी, कामगार, कंत्राटी नोकरदार, शेतकरी, SC-ST-OBC, अल्पसंख्याक व सर्वसामान्य बहुजन समाजावर अन्याय वाढत आहे. संविधानिक हक्कांवर गदा येत आहे. अशा परिस्थितीत फुले–शाहू–आंबेडकरांचा विचार केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय स्तरावर संघटित होणे काळाची गरज आहे.”या अधिवेशनातक र्मचारी व कामगारांचे प्रश्नखा सगीकरण व कंत्राटीकरणाविरोधातील भूमिका संविधान संरक्षण सामाजिक न्याय व आरक्षण बहुजन युवकांचे नेतृत्व संघटनात्मक विस्तार या सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा व ठोस निर्णय घेतले जाणार आहेत.
📢 ऐतिहासिक अधिवेशन – नवे नेतृत्व, नवी दिशा
भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या संयुक्त राष्ट्रीय अधिवेशनातून नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी, पुढील आंदोलनाची दिशा आणि देशव्यापी संघर्षाचा आराखडा जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
विठ्ठल दांडगे पुढे म्हणाले,
“हे अधिवेशन म्हणजे केवळ संघटनेचा कार्यक्रम नसून, बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचा आणि संविधानिक लढ्याचा राष्ट्रीय मंच ठरेल.”
🔔 बहुजन समाजाला स्पष्ट आवाहन
अखेर त्यांनी सर्व फुले–शाहू–आंबेडकरवादी कार्यकर्ते, सामाजिक संघटना, कर्मचारी, कामगार, युवक-युवती, शेतकरी व परिवर्तनवादी शक्तींना आवाहन केले की,
“30, 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन बहुजन एकजूट मजबूत करावी.”

Post a Comment
0 Comments