*🚩 "आधी सेवा वृद्धाश्रमातील निराधार माता-पित्यांची, नंतर पूजा केली कुळदैवतांची" 🚩*
*🌹 संजय कडोळे यांच्याकडून श्री कामाक्षा देवी मंदिरात जोगव्याचा भव्य महाप्रसाद संपन्न 🌹*
*कारंजा (लाड) :* महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, दिव्यांग सेवक, ज्येष्ठ साहित्यिक, लोककलावंत आणि पत्रकार संजय मधुकरराव कडोळे हे जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाचे अध्यक्ष तसेच आद्यशक्ती श्री कामाक्षा देवीचे गोंधळी आहेत. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ते घरोघरी जोगवा मागतात आणि लग्नप्रसंगी गोंधळ-जागरणाचे कार्यक्रम करतात. मिळालेला जोगवा व दक्षिणा स्वतःसाठी न वापरता ते दानधर्मासाठी खर्च करतात आणि नवरात्रानिमित्त महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात.
यावर्षी महाप्रसादाच्या दिवशी त्यांनी आपल्या मातोश्री श्रीमती दुर्गाबाई मधुकरराव कडोळे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वप्रथम स्थानिक श्री भायजी महाराज वृद्धाश्रम, कारंजा येथे भेट दिली. त्यांच्यासोबत सौ. संगीताताई इंगोले, सुधाकर इंगोले, शाहिर देवमन मोरे, उमेश अनासाने, ह.भ.प. लोमेश पाटील चौधरी, कैलास हांडे, पत्रकार विनोद गणवीर, श्री कामाक्षा देवी संस्थानचे सचिव रोहित महाजन हे उपस्थित होते.
तेथील बावीस ते पंचवीस निराधार व बेघर वृद्ध माता-पित्यांचे दर्शन घेऊन, सर्वांच्या अंगावर उपरणे पांघरून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना भोजन देण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका सौ. पूजाताई राधेशाम राठोड तसेच कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कुलस्वामिनी श्री कामाक्षा देवी मंदिरात मातेचे पूजन व महाआरती करण्यात आली. सर्वप्रथम कन्याभोजन म्हणून सुहासिनींचा सन्मान करून महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होता.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठिया, व्यसनमुक्ती सम्राट दिलीपजी गिलडा, प्रदीप वानखडे, शिवसेना जिल्हाध्यक्षा प्रिया महाजन, स्त्री शक्ती मंचच्या संस्थापक अध्यक्षा शारदा अतुल भुयार, लोमेश चौधरी, उमेश अनासाने, रोहित महाजन, पांडुरंग माने, मोहित जोहरापूरकर जैन, केशव काळे, संत गजानन महाराज मंदिराचे सुरेशराव ठाकरे गुरुजी, गजानन पाटील कडू, खासदार संजय भाऊ देशमुख यांचे सचिव (पी.ए.) ओंकार काकडे, सुनील गुंठेवार, नगरसेविका चंदाताई कोळकर, नगरसेविका कुसुमताई अघम, नगरसेविका कांचनताई डेंडूळे, विजय खंडार, बाळकृष्ण काळे, नंदूभाऊ कवळकर, अनिल भेलांडे, कैलास हांडे, पूज्य सिंधी पंचायत कारंजाचे मुखीया भगवानदास खेमवानी, बच्चुभाई केसवानी, वासुदेव कटारिया, पत्रकार सदानंद वानखडे, महेश जवाहरमलाणी आदींनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजसेवक संजय कडोळे आणि सुधाकरराव इंगोले यांनी अथक परिश्रम घेतले.
---




Post a Comment
0 Comments