वाशिम प्रतिनिधी.
वंचित बहुजन आघाडी जिल्हाच्या वतीने नामदार गिरीश महाजन यांचा निषेध
वंचित बहुजन आघाडी जिल्हाच्या वतीने राजपाल यांना जिल्हाधिकारी मार्फत निषेध निवेदन देण्यात आले.
त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नाशिक जिल्ह्य़ाचे पालक मंत्री मा.नामदार गिरीश महाजन यांनी स्वतंत्र भारताचे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाच्या आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घेण्याचे मुद्दामून टाळले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने वंचित बहुजन आघाडी जिल्हा वाशिम तीव्र शब्दांत निषेध करते.
घटनाकाराचा विसर पडणे ही लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे.समता,स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्य देणाऱ्या संविधानकारांचा विसर पडणे हे अत्यंत चुकीचे आणि अपमानास्पद आहे. मा. नामदार गिरीश महाजन ज्या संवैधानिक पदावर आहेत त्या पदाच्या गरिमेला धक्का पोहोचला आहे. मा.गिरीश महाजन यांच्या या कृत्यांमुळे संपूर्ण आंबेडकरी समाज आणि बहुजन समाज यांच्या भावना दुखावल्या आहेत. मा.गिरीश महाजन यांची ही अक्षम्य चूक आहे. त्यामुळेच वनविभागाच्या माधवी जाधव व त्यांची सहकारी भगिनी दर्शना सौपूरे या दलित भगिनीने आक्रोश केला.त्या भगिनींच्या अस्मितेला, दलित आणि बहुजन समाजांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे.अशा जातीयवादी मंत्र्याला ताबडतोब पदमुक्त करावे. त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर अँट्राॅसिटी अँक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी.
या निवेदनावर जिल्हा महासचिव प्रा.रंगनाथ धांडे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतीताई इंगळे,विनोद भगत, संतोष सरकटे,समाधान भगत, बाळासाहेब खंडारे,सुशीला खाडे,गोविंद वर्मा,अमोल पखाले,समाधान मोरे,सुनिता खाडे, सरेश सोनोने,अनंत कुमार जुमडे,दिपक आगलावे,वसंतराव राठोड, एकनाथ भगत, दिलीप भगत, स्वप्नील खडसे,अरुण भगत, किरण खडसे,वैभव खडसे आदींच्या सह्य़ा आहेत.


Post a Comment
0 Comments