जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाकडून वारकरी सन्मान सोहळा संपन्न.* "संत गजानन महाराज प्रगटदिनाच्या तयारीसाठी कार्यक्रम.आमदार सईताई डहाके यांच्या उपस्थितीने वारकरी झाले आनंदोत्साही."
कारंजा प्रतिनिधी.
*कारंजा (लाड)* : संत गजानन महाराज मंदिर कारंजा येथील वारकरी सन्मान सोहळ्यात बोलतांना, कारंजाच्या लोकप्रिय आमदार सईताई डहाके यांनी,"कारंजा शहरातील पहिल्या व पुरातन संत गजानन महाराज मंदिराच्या विकासामध्ये कमी पडू देणार नाही.येथील सभागृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार.तसेच वारकरी भजनी मंडळाला भजनाचे साहित्य उपलब्ध करून देणार." असल्याचे आवर्जून सांगीतले.आमदार सईताई डहाके यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे वारकरी प्रचंड आनंदीत व उत्साहीत झाल्याचे दिसून आले.या बाबत सविस्तर बातमी अशी की,कारंजा येथील शहर पोलीस स्टेशन प्रांगणातील संत गजानन महाराज मंदिरामध्ये,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यीक,लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळ कारंजा, गेल्या अकरा वर्षापासून,श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये भालदार चोपदाराची निःस्वार्थ सेवा देत असते.त्यामुळे यावर्षी धार्मिक व आध्यात्मिक सेवाव्रती असलेल्या मातोश्री वैकुंठवासी सौ.स्नेहलताबाई पुनमचंदजी सोमाणी यांच्या पवित्रपावन स्मृतीप्रित्यर्थ,श्रींचे निष्काम सेवाधारी,तरुण क्रांती मंचाचे अध्यक्ष निलेशजी सोमाणी यांचे कडून पुरुष वारकरी मंडळींना गणवेशाच्या कापडाचे आणि महिला मंडळींना साड्यांचे आणि गोंधळी कलावंत स्व. उमेश कडोळे स्मृती निमित्त तुळशी घेणाऱ्या महिलेला पैठनी आणि कलश यात्रेतील महिलांना साड्यांचे तसेच पत्रकार अमोल अघम यांचेकडून कलशाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार सईताई डहाके,बाजार समितीचे उपसभापती प्रकाशभाऊ लिंघाटे,नगरसेविका कुसुमताई अघम तथा नगरसेविका चंदाताई कोळकर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रींचे निष्काम सेवाधारी सुरेशराव ठाकरे गुरुजी तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये गजानन पाटील कडू,मिंटूभाऊ सागानी आणि सेवाधारी संजय कडोळे, खोलेश्वर पाटील खुपसे, वडाळकर दादा,साहेबराव पापडे उपस्थित होते.याप्रसंगी आमदार सईताई डहाके,उपसभापती प्रकाश लिंघाटे,नगरसेविका कुसुमताई अघम,नगरसेविका चंदाताई कोळकर आणि मान्यवरांच्या हस्ते वारकरी महिला मंडळ तालुकाध्यक्षा कांता लोखंडे, विणेकरी इंदू बाई चव्हाण,सुनंदा लोखंडे,अन्नपूर्णा लोखंडे,राजु असलमोल,शंकर ढळे, अजाबराव ढळे,अजाबराव मात्रे,अविनाश लोखंडे, उमेश अनासाने,प्रदिप वानखडे, नंदूभाऊ कव्हळकर,लोमेश चौधरी,माणिकराव हांडे, बाळकृष्ण काळे, संतोष शेगोकार, अशोक हांडे, कैलास हांडे,गोपाल मुदगल, विजय खंडार, सुनिल गुंठेवार यांना कापडाचे व जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ आणि महर्षी वाल्मिकी हरिपाठ मंडळ दिघीच्या वीस महिला वारकऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोककलावंत ज्ञानेश्वर खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रदिप विनायकराव वानखडे यांनी केले.


Post a Comment
0 Comments