Type Here to Get Search Results !

कारंजा लाड मध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन


कारंजा लाडमध्ये हिंदू-मुस्लिम एकतचे दर्शन दुर्गा विसर्जन मंडळांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार


शांतता समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून सामाजिक सलोख्याचा संदेश


कारंजा लाड, जिल्हा वाशिम : महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरात हिंदू-मुस्लिम एकत बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा विसर्जनाच्या निमित्ताने विविध दुर्गा विसर्जन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


या उपक्रमात नगीन मज्जिद चे आलिम साहब व शांतता समिती सदस्य जहीर भाई समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते अजहर अहेमद N.A., दिलीप रोकडे पाटील, पत्रकार बिसू पहलवान, मुन्ना भाई नगरसेवक आणि रामदास भाऊ यांनी सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येऊन दुर्गा विसर्जन मंडळांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.


हिंदू-मुस्लिम एकत हीच कारंजा लाडची ओळख!


सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरा जपण्याचे माध्यम नसून समाजातील प्रेम, आपुलकी आणि एकोपा वाढवण्याची संधी असते. विविध धर्मांचे नागरिक एकमेकांच्या सणांचा आदर करून एकत्र येतात, तेव्हा सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. कारंजा लाडमध्ये पार पडलेला हा उपक्रम याचे उत्तम उदाहरण ठरला.


शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, सर्व धर्मांच्या नागरिकांमध्ये परस्पर आदर वाढावा आणि प्रत्येक सण-उत्सव आनंदाने व शांततेत साजरा व्हावा, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


“धर्म वेगवेगळे असले, तरी माणुसकी एकच आहे. हिंदू-मुस्लिम एकत, बंधुभाव आणि परस्पर आदर हीच आपल्या शहराची खरी ताकद आहे.”


कारंजा लाड शहरातील नागरिकांनी एकतेची ही परंपरा कायम जपत शांतता, सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 अजहर अहेमद N.A सामाजिक कार्यकर्ता कारंजा लाड, जिल्हा वाशिम
 

Post a Comment

0 Comments