Type Here to Get Search Results !

कारंजा लाडच्या स्पर्धा परीक्षेत हर्ष सागर चौधरीचा दबदबा; प्रथम क्रमांकासह ५१०० रोख बक्षीस पटकावले!



*महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाइन सेंटरच्या वतीने विद्यार्थी विकास स्पर्धा परीक्षा २०२६ स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कारंजा लाड प्रतिनिधी. 

 
कारंजा लाड येथील श्री गुरुदेव सेवाश्रम, शांतिनगर येथे रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र न्यूज २४ लाईव्ह संलग्न व आदर्श ऑनलाइन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “विद्यार्थीकरीता विकास स्पर्धा परीक्षा २०२६” या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा फरीदाबाद मोहम्मद शफी पुंजानी यांच्या वतीने गटनेते मोहम्मद बिलाल मोहम्मद युसुफ पुंजानी हे उपस्थित होते. तसेच नगरसेवक ॲड. फिरोज शेकुवाले यांनी विशेष उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विनयकुमार सोनाने (प्रबुद्ध भारत समिती, कारंजा), श्री.राहुलदेव मनवर (सामाजिक कार्यकर्ते) व श्री. गजानन कापशीकर (शिक्षक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून श्री. राजकुमार दिघडे, प्रा. डॉ. दिनेश रघुवंशी व प्रा. राम शेजव यांनी काम पाहिले. यावेळी नगरसेवक ॲड.फिरोज शेकुवाले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळ व्यवस्थापन व सातत्य राखण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह च्या मुख्य संपादक श्री. विनोद गणवीर, सहसंपदिका सौ. भाग्यश्री उर्फ मोनाली गणवीर, विदर्भ संपादक श्री.भानुदास पवार, व संयोजक श्री.सुजीत भगत यांनी केले.

विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हाव तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रगती वावी या अनुषंगाने महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाईन सेंटरच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमामुळे इतर सर्व शालेय व विद्यालयातील विद्यार्थ्यांना निश्चितच नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

तसेच या कार्यक्रमाला अथक परिश्रम व प्रयत्न महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह च्या मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे तसेच माजी प्रतिनिधी रामेश्वर डेडुळे यांनी केले.



Box.
महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संचालित आदर्श ऑनलाइन सेंटरच्या वतीने विकास स्पर्धेमध्ये तीन बक्षिसाचे आयोजन करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, तरीसुद्धा प्रथम बक्षीस 5100 ट्रॉफी व प्रमाणपत्र सह विद्यार्थी चे नाव हर्ष सागर चौधरी श्रीमती शोभनाताई चवरे माध्यमिक विद्यालय कारंजा यांनी पहिले बक्षीस पटकावले तसेच दुसरे बक्षिसाचे मानकरी जितेंद्र रामेश्वर शिंदे जे सी हायस्कूल कारंजा लाड हे झाले असून त्यांना सुद्धा रोख रक्कम तीन हजार व ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र सहसंबंधित करण्यात आले तर अंतिम तिसरे बक्षीस प्रांजली योगेश काळे राहणार आखतवाडा जिल्हा परिषद मराठी शाळा यांनी पटकावले महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह च्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता तसेच इतरही विद्यार्थ्यांकरीता हा उपक्रम सतत राबविण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह च्या संपादक विनोद कुमार गणवीर यांनी दिल्ली..

Post a Comment

0 Comments